मर्यादा, म्हटले की एक अप्रतीम 'मानवी' व्यक्तीमत्व उभे राहते ते म्हणजे 'मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम'. हो खरच हा एकच मानवी 'देव' जो मानव बनून मानवासारखा वागला. आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की सर्व मर्यादा पाळून मानव एक 'समर्थ' आणि 'स्वयंपूर्ण' जीवन जगू शकतो. पण फक्त सत् युग सोडले तर बाकी सर्व युगांमध्ये मर्यादेत न राहिल्यामुळे मानवाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. रामायण, महाभारत सारखे असंख्य जीवीत आणि वित्त हानी करणारे महासंग्राम झाले. 'मर्यादा'भंग म्हणजेच प्रज्ञापराध. असे प्रज्ञापराध वाढत गेले आणि मानव आज कलियुगाचा बंदिवान बनून राहिला. कारण संपूर्ण जग हे परमात्म्याच्या नियमानेच चालते. जसे कर्म तसे फळ. पण तरीही तो परमात्मा येतच राहतो श्रद्धावानांच्या रक्षणासाठी अगदी पुन्हा पुन्हा प्रत्येक युगामध्ये.
हे म्हणजे आध्यात्माचे धडे जे आजच्या जगाला आवडत नाहीत आणि मान्य नाहीत. तरीही तो परमात्मा परमकृपाळू असल्यामुळे आजही तो आपल्याला मर्यादायोग शिकवण्यासाठी आला आहे. अगदी या कलियुगाच्या काळ्या छायेतून बाहेर काढण्यासाठी.
हा blog आपल्याला (खरं तर मला स्वत:ला) मर्यादा म्हणजे नक्की काय आणी कोणकोणत्या मर्यादा आपण पाळू शकतो याचे सम्यक ज्ञान देणार आहे. खास करून कोणकोणत्या क्षेत्रात आपण या मर्यादा पाळल्या पाहिजेत हे सांगण्याचा प्रयत्न या ब्लॉग च्या माध्यमाने केला जाईल.
एक उदाहरण द्यायचे झाले तर आज मानवाने निसर्गाशी पाळायच्या मर्यादा तोडून global warming सारखे भयावह संकट स्वत:वर ओढवून घेतले.
ह्या ब्लॉगचे मुख्य उदिष्ट सर्व स्थरांवर मर्यादा हाच तारक मार्ग आहे हे सिद्ध करणे.
आणि त्यासाठी हे कार्य सुरु करण्यापूर्वी ज्यांनी मर्यादा मार्गाची ओळख पुन्हा एकदा करून दिली अश्या माझ्या आध्यात्मिक आणि प्रापंचिक (सर्व स्थरांवरील) गुरू प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध (बापू) यांचे स्मरण करतो.
![]() |
Real path of success |
हरि ॐ!!